तुळजापूर/ प्रतिनिधी-

मराठासमाजासाठी गेली अनेक वर्षापासुन  तळमळीने काम करणाऱ्या महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक सुनील श्रीराम  जवंजाळ पाटील यांची  सारथी संस्थेवर निवड करण्याची मागणी मराठा समाज बांधवांन मधुन केली जात आहे.

मराठा समाज उन्नती साठी असलेल्या सारथी संस्थेसाठी संचालक नेमण्याचा हालचाली सुरु आहेत या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अखंड भारतातील मराठा समाज बांधवांचे संघटन,राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाना  उपस्थित राहून समाजाचे संघटन करून राज्यात जवळपास 340 तालुक्यात मराठा सोयरिक ग्रुप कार्यान्वित करुन ,ग्रुपवर मराठा समाजाच्या लग्नाच्या मुला मुलींची बायोडाटा राज्यभर फिरवले जातात, या ग्रुपचा कारभार पारदर्शक असल्याने राज्यातील व्यवासायीक   विवाह संस्थांना आळा बसला आहे व मराठा समाजातील वधुवरांची होणारी फसवणूक टळली आहे,या ग्रुपमध्ये मराठा समाजातील जातीउपजाती असा भेदभाव न करता एक मराठा लाख मराठा या उद्देशान काम होत आहे.

राज्यातील 26 जिल्ह्यात महाराष्ट्र मराठा सोयरिक या ब्याँनरखाली मराठा समाजाचे विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह वधुवर परिचय मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन, इतक्यावरच न थांबता राज्याबाहेर पानिपत येथेही मेळावा,जवजाळ यांनी घेतल्याने मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सुनिल जवजांळ पाटील यांची सारथी संस्थेवर संचालक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.


 
Top