उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीच्यावतीने मंगळवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

सांजावेस गल्लीतील जंगम मठात रविवारी (दि.20) घेण्यात आलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि.22) आयोजित करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता घंटानाद आंदोलन करुन स्थानिक स्वराज्य  संस्थातील राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे. आंदोलन लोकशाही मार्गाने होणार असून यावेळी कोरोनाच्या मार्गदर्शक़ सुचनांचे व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी राजकीय आरक्षण व बचाव समितीने  केले आहे. बैठकीस समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top