उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेत व सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक छोटे व्यावसायिक फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊन शिथील झाल्या‍नंतर या व्यवसायिकांना आपला व्यवसाय नव्याने सुरु करण्याकरिता भांडवल नव्हते ही अडचण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांनी फेरीवाल्याकरिता आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतुन पी.एम. स्वनिधी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.पी.एम.स्वनिधी योजनेतुन लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना 20 हजार रुपये कर्जा करिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या वेळी उस्मानाबाद जिल्हयातील व्यवसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. तसेच आमदार सुजितसिंह ठाकुर , भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे , भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील प्रतिष्ठाण भवन याठिकाणी आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली व त्या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातुन शेकडो लाभार्थ्यांना पी.एम.स्वनिधी योजनेतुन रुपये 10000/- पर्यंतचे कर्ज मिळवुन दिले. ज्या लाभार्थ्यांनी या कर्जाचा नियमित परतावा केलेला आहे त्या लाभार्थ्यांना पुनश्च एकदा रु.20 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. तरी या कर्ज योजनेचा लाभ सर्व व्यवसायिकांनी घ्यावा व आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा संयोजक सचिन लोढें यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केलेले आहे.


 
Top