उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरातील शिवनेरीनगरमधील टापरे बिल्डींगजवळ होणारा बालविवाह थांबविण्यात महिला व बाल विकास विभागाला यश मिळाले आहे.

 अल्पवयीन मुलीचा 4 जून 2021 रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांना मिळाली. उस्मानाबाद शहरातील होणा-या बालविवाह थांबविण्यासाठी उस्मानाबाद येथील बाल विकास प्रकल्प्‍ अधिकारी अनिल कांबळे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबतची माहिती दिली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी योगेश शेगर व श्रीमती प्रज्ञा बनसोडे, हर्षवर्धन सेलमोहकर यांना बालविवाह थांबविण्यासाठी सांगण्यात आले.

  त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचा-यांनी,सरपंच,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक श्री.राठोड आणि पोलिस कॉ.श्री.काटकर,गावातील  तलाठी यांनी  अथक परिश्रम घेवुन तात्काळ बालविवाह थांबविला.या बाल विवाहाचा पाठपुरावा करत सकनेवाडी येथे दि.03 जून-2021 सांयकाळी 7.30 वा. जावुन येथील हे हजर असुन बाल विवाह अधिनियम 2006 कलम 10 व कलम 11 नुसार कायदयाचे उल्लधंन केल्यास 2 वर्ष सक्षम कारावास व 1 लाख रु.दंड व सदरील अपराध हा अजामिन पात्र गुन्हा आहे. वधु वराच्या आई वडीलास व गावातील रहिवांशाना समजुत देण्यात आली. त्या संबधीचे हमीपत्र लिहुन घेवुन तलाठी यांनी पंचनामा केला.वधुच्या आई वडीलास बाल कल्याण समिती समोर हजर होण्यासाठी सांगितले.

 
Top