तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाला गुंज या सेवाभावी संस्थेच्या वतीने पी. पी .ई .किट व  सॅनिटायझरच्या बाटलीचे वाटप करण्यात आले.

तेर येथील ग्रामीण रुग्णालयाला गुंज सेवाभावी संस्थेचे मराठवाडा समन्वयक अजित कांकरिया यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नांग नंदा मगरे यांच्याकडे 15 पी. पी.ई. किट व 6 मोठ्या सॅनिटायझरच्या बाटल्या  सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी तानाजी पिंपळे,  माधव मगर ,नरहरी बडवे, सविता चाकाटे आदी उपस्थित होते.

 
Top