उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शन केल्याबद्दल  उस्मानाबाद शहरातील चिरायु हॉस्पिटलचे डॉ.वीरेंद्र गवळी यांचा अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 अंजुमन  हेल्थ केअर सोसायटी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या कार्यामध्ये उस्मानाबाद शहरातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार आणि जीवदान मिळत आहे. डॉ. वीरेंद्र गवळी हे देखील संस्थेकडे मदत मागण्यासाठी आलेल्या रुग्णांवर वेळोवेळी सहकार्याच्या भावनेतून उपचार करत आहेत.याबद्दल अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे व्यवस्थापक आशिष वाघमारे, सोसायटीचे सदस्य वसीम शेख, अलीम शेख, नदीम शेख, अजहर शेख, मोहसिन सय्यद उपस्थित होते.

 
Top