लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयाच्या प्रांगणात व भातगळी, जेवळी येथे घन वृक्ष लागवडीचे शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी  विजयकुमार फड, उपायुक्त  अविनाश गोटे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत ) नितिन दाताळ यांच्या हस्ते करण्यात आला.

वृक्ष लागवडसाठी शाळेची जागा देण्यात आली. त्यामुळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव लोभे, उपाध्यक्ष त्र्यंबक मोरे, सचिव दिलीपराव कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, गटशिक्षण अधिकारी तब्बसुम सय्यदा, सरपंच कानेगाव नामदेव लोभे  कानेगाव, ग्राम विकास अधिकारी एम.एस. भिल्ल, उपसरपंच आशा कदम कानेगाव, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे जेवळी, संत मारुती महाराज विद्यालय कानेगाव चे प्रभारी मुख्याध्यापक एस.एस. पवार, एम.टी.भोसले, व्हि. एन.क्षीरसागर, के.एस. पवार, आर.आर.वळवी, ए.ए‌.शिंदे, एस.डी.गाटे, ए. के.शेवाळकर, एस.जे.कांबळे, बालाजी सूर्यवंशी, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top