परंडा/ प्रतिनिधी -

परंडा- भुम -वाशी मतदार संघातील आधारवड सौ.वैशालीताई राहुल मोटे यांची गर्भनिदान प्रतिबंधक (PCPNDT) महाराष्ट्र राज्याच्या पर्यवेक्षक मंडळाच्या सदस्या पदी निवड झाल्या बद्दल परंडा- भुम -वाशी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुक्रवार दि.११ रोजी गिरवली येथे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,परंडा तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, वाशी तालुका अध्यक्ष संभाजी राव शिंदे, भुम तालुका अध्यक्ष रवींद्र वाघमारे ,कळंब तालुका अध्यक्ष किरण मस्के, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र अहिरे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे , रंगनाथ ओहाळ, कुंडलिक शिंदे, शंकर अल्हाट, राजेंद्र जाधव, विठ्ठल कांबळे, अजय बनसोडे, भाऊ कुचेकर, अमोल ओहाळ , सचिन भोसले, शिवम माने, प्रतीक बनसोडे,   सूर्यकांत बनसोडे, रुपेश बनसोडे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top