उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील गावच्या सरपंचांनी कोरोनामुक्त गाव करण्यासाठी अतिशय उत्तम काम केले आहे. त्यांनी गाव स्तरावरील भाषेतून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गावागावांमध्ये व्हाट्स अॅप ग्रुप तयार केले. त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती झाल्याने अनेक गावे कोरनामुक्त झाली आहेत. त्यामुळे व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी पडणारे कार्य प्रत्येकांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरपंचांशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधताना केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच करीत असलेल्या कामाचे भरभरून कौतुक करून कोरोना रोखण्यासाठी  मी तुम्हाला सूचना करणार होतो. परंतू सरपंचाकडूनच सूचना मला मिळाल्या याचा मला अभिमान वाटत असून असेच चांगले काम प्रत्येक गावच्या सरपंचांनी केल्यास राज्य कोरोनामुक्त होईल. केंद्र सरकारने देखील अशा पद्धतीने उपक्रम राबविल्यास संपूर्ण देश लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

 राज्यातील सरपंच यांच्याशी झूम मीटिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंच यांच्याशी दि.११ जून रोजी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोलीचे सरपंच येडबा भगवान शितोळे,  तेरचे सरपंच नवनाथ मधुकर नाईकवाडी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच कोरोनामुक्त गाव करण्यासाठी अतिशय चांगले काम करीत असून अशाच पद्धतीने यापुढेही काम करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच कोरून बाबत जनजागृती करण्यासाठी पारंपरिक कला असलेल्या वारली, वासुदेव वाघ्या-मुरळी यांची देखील मदत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. हे कोरोनाने नाहीतर आपण ठरविले पाहिजे. त्याला ठरवू द्यायचे नाही. प्रत्येकाने ठरवले तर तो गावात येणार नाही असे सांगून त्यांनी गावातील नागरिकांचे सरपंचांनी लसीकरण करण्यासाठी स्वतः प्रथम लसीकरण करून गावकऱ्यांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. तर गावच्या आरोग्यासाठी सरपंच जो आपलेपणा दाखवीत आहेत त्यामुळे सर्व सरपंचाचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी  सरपंचांचे कौतुक केले. तसेच सध्या कोरोना बाधितांची संख्या मंदावलेली असली तरी तरी प्रत्येकाने सावध राहणे महत्त्वाचे असून आपल्याला कोरोनाची नजर हटवायची नाही अशा सक्त सूचना देऊन ते म्हणाले की, आता पाऊस सुरू झाला असून प्रत्येक मोसमानुसार आजार येत असतात. त्यामुळे त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती पावले उचलावीत असे निर्देशही त्यांनी दिले.

 सरकार पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की तुम्ही पुढे चला सरकार पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत असून तुम्ही कोरोना रोखण्यासाठी गावस्तरावर टीम तयार करायचे आहे व प्रत्येकावर छोटे-छोटे काम सोपवून प्रत्येक गाव कोरोना मुक्त झाले तर राज्य करुणा मुक्त होईल व हेच धोरण केंद्राने अवलंबिले तर देश कोरोना मुक्त होईल असा आत्मविश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही यावेळी सरपंचांना मार्गदर्शन केले.

 सतत चाचणी करणे आवश्यक

 राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र सरकार आरोग्यसुविधा देण्यास कुठेही कमी पडणार नाहीत. मात्र आरोग्य सुविधा वाढविणे म्हणजे खरा विकास नाही तर आपल्या गावाला आरोग्य सुविधा न वाढविणे हा खरा विकास आहे. त्यामुळे यापुढेही कुठेही गर्दी न होऊ देणे, सतत स्वच्छ पाण्याने हात धुणे व सॅनिटायझर करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूंची लागण कमी जास्त होत असून बेसावध असतानाच करुणा घात करत असल्यामुळे कोणीही गाफील राहू नये असे त्यांनी केले. तर तर डेल्टा हा सगळ्यांची डोकेदुखी झाली असून लोक डाऊन अजूनही उठविलेला नाही कारण या महामारी यातून आपल्याला वाचविण्यासाठी कोणीही मदतीला येणार नाही पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाण्याने सीमारेषा उरल्या नंतर आपणाला स्थलांतर करू लागते मात्र आरोग्याची मर्यादा पाहून जागृत पणाने राहिले तरच आपण यावर चांगल्या पद्धतीने मात करू शकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

 या जिल्ह्यातील सरपंचांनी नोंदविला सहभाग

 या संवादांमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनामुक्त गावासाठी काम कसे केले व कोणत्या अडचणी आल्या तसेच यापुढे कसे काम करणार ? याची सविस्तर माहिती दिली.

 पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरासमोर कोणालाही फिरकू न दिल्यामुळे शिंगोली व तेर कोरोनामुक्त

 यावेळी शिंगोली येथील सरपंच ये डब्बा शितोळे व तेर चे सरपंच नवनाथ नाईकवाडी म्हणाले की,  आमची गावे शहराच्या जवळ असल्यामुळे शहरातून गावात येणार्‍या व गावातून शहरात जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान जो व्यक्ती पॉझिटिव आढळला त्या व्यक्तीच्या घरासमोर इतर कोणत्याही व्यक्तीला १० दिवस अजिबातच फिरकू दिले नाही. त्यामुळे आमची गावे कोरोनामुक्त झाली असल्याची माहिती हिंगोली चे सरपंच येडबा शितोळे व तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्या गठीत करून त्यामध्ये शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश करण्यात आला. या सदस्यांवर प्रत्येकी ४०

 नागरिकांची जबाबदारी सोपविण्यात आली. दिवसभर करण्यात आलेल्या कामाचा आढावा ग्रामसेवक संध्याकाळी दररोज १० वाजता घेत असल्यामुळे पूर्णपणे माहिती संकलित होण्यास मदत झाली. तर लोकवर्गणी व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे १० दिवस कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले. तसेच ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण देखील ८५ टक्के करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे चांगल्या पद्धतीने जनजागृती करुन या कोरोनावर यशस्वीपणे मात करण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. 

 
Top