तुळजापूर  / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उस्मानाबाद  जिल्हा कार्याध्यक्ष पदी तुळजापूर  शहरातील विवेक विलासराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली.विवेक शिंदे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेवुन त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे.या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधुन स्वागत होत आहे.


 
Top