तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आरळी खुर्द येथील सुभाष शिवाजी पारवे यांची नियुक्ती करण्यात आली.   राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पञ  देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली.या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधुन स्वागत होत आहे.  

 
Top