परंडा/ प्रतिनिधी -

प्रलंबीत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करून आदेश निर्गमित करावेत यास्तव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अरविंद मोहरे यांना निवेदन देण्यात आले.

वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावित देयके तब्बल दीड वर्षापासून मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत.कोविड-१९ च्या संसर्गाने काही शिक्षकांसह कुटुंबातील पत्नी,मुले बाधित झाल्याने शिक्षकांना आर्थिक समस्या भेडसावत आहे, उपचारासाठी लक्ष दीड लक्ष खर्च झालेला आहे, शासकीय नियमानुसार ३% रक्कम शासन खाती जमा करून सदरील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शिक्षण विभागाला सादर केलेली आहेत ते आजतागायत मंजूर झालेली नसल्याने शिक्षकांचे डोक्यावर आर्थिक संकट घोंगावत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तेंव्हा सर्व प्रलंबीत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करून आदेश निर्गमित करावेत नि शिक्षकांची आर्थिक समस्या सोडवावी अशी मागणी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदरील निवेदनावर प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले आदि पदाधिकारी यांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top