तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर व चव्हाणवाडी गावात खुलेआम अवैध दारु विक्री व शिंदी व्यवसाया सुरु आहे.त्यामुळे याच्या विरोधात फुले मंडळाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. हे अवैध धंदे त्वरीत बंद करून संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वितीने निवेदन देऊन करण्यात आली. 

 शिरगापूर  येथे  सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या  सदस्याची  गावात   बैठक  संपन्न झाली.  या बैठकीत  महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेवुन २५ ते ३० महिलानी  नळदुर्ग पोलीस ठाणे गाठले. महिलांनी लेटर पॅडवर पोलिसाना तक्रार  देवुन  दारूबंदी करण्याची विनंती केली .  पोलिसांनी तत्परता  दाखवून तात्काळ कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला. गावात जाऊन एका  विरुध्द कारवाई केली.   

यासाठी सावित्रीबाई महिला मंडळाच्या अज्ञान बनसोडे, मीरा गायकवाड, शुभांगी जाधव,अंजना जाधव,नागिनी पवार.व महिला मंडळाच्या  महिला सदस्यानी पुढाकार घेतले. 


 
Top