उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.25 जून-2021 रोजी जिल्हयातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक,तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया,महाराष्ट्र ग्रामीण बँक या प्रमुख बँकांचे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम 2021-22 मधील कर्ज वाटपाबाबत जिल्हयातील सर्व बँक शाखाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. बॅकांना दिलेले पीककर्जाचे लक्षांक 15 जुलै-2021 पर्यंतपूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

 बैठकीमध्ये सर्व बँकर्सना दि.15 जुलै 2021 पूर्वी त्यांना देण्यात आलेल्या लक्षांकाच्या शंभर टक्के पीक कर्ज वितरण करण्यासाठी तसेच एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याशिवाय, कर्ज वितरणातील विलंब टाळण्यासाठी पीककर्ज मंजुरी प्रक्रियेत सुलभता आणण्याचे आणि प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी प्रमुख बँकांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले.

 या बैठकीमध्ये जिल्हयातील शेतक-यांकडील पीककर्जाचे दि. 30 जून 2021 पूर्वी नुतनीकरण करुन घ्यावे आणि डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेव्दारे शून्य टक्के  (शुन्य टक्के) व्याज दराचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

 

 
Top