तुळजापूर /प्रतिनिधी 

येथील जुन्या बसस्थानकातील चौकात सेट्रींग काम करणाऱ्या  मजुराचे अडीच हजार रुपये पडले असत सदरील पैसे तिथे ड्युटीस असणाऱ्या  पुरुष व  महिला पोलिस  ट्राँफिक कर्मचाऱ्यांना सापडले. त्यांनी सदरील मजुराचा शोध घेवुन त्यास परत दिल्याची घटना सोमवार दि. १४रोजी सांयकाळी ५ वाजता घडली. या प्रामाणिक पोलिसांचे सर्वञ कौतुक  होत असुन कोराेनाचा संकट काळात ही माणुसकी टिकुन असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होते.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, येथील जुन्या बसस्थानकातील चौकात  तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तानाजी बळीराम देवकर  हे मोटार सायकलवरुन गावाकडे जाताना त्यांच्या खिशातील पाकीट रस्त्यावर पडले असता तिथे ड्युटीस असणाऱ्या हवालदार आत्माराम सावरे व गोवर्धन माने या ट्राँफिक पोलीस व दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी सदरील इसमाचा हाँटेल चालक मनसे नेते मयुर गाडवे यांच्या माध्यमातून  शोध घेवुन त्यास पाकीटातील खनाखुना विचारुन किती पैसे आहेत अशी विचारणा केली असता त्याने बरोबर सांगितल्याने ओळख पटवून सदरील गरीब कामगाराचे पैसे त्याच्याकडे सपूर्द केले.या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वञ कोतुक होत आहे


 
Top