तुळजापूर /प्रतिनिधी 

शालेय कामकाज आरंभ झाल्याने विविध कामांसाठी विद्यार्थांंना गावातुन शहरात यावे लागत आहे.तरी त्यांची अर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागात सेवा सुरु करण्याची मागणी श्री तुळजाभवानी महाविद्यालयातील विद्यार्थांंनी आगार प्रमुखांना निवेदन देवुन केली आहे.

आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्या शैक्षणिक सञ कामकाज सुरु झाले आहे. प्रवैश फाँर्म,परिक्षा फाँर्म,शिष्यवृत्ती फाँर्मसह अन्य शैक्षणिक कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थांना शहरात यावे लागत आहे खाजगी वाहनचालक या विद्यार्थांकडुन अवाजवी भाडे आकरुन त्यांची अर्थिक लूट करीत आहेत तरी विद्यार्थांंची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी ग्रामीण भागात एसटी फेऱ्या सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन श्री तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थां प्रतिनिधी अलोक शिंदे सागर गंगणेसह अनेक विद्यार्थांंनी दिले आहे.


 
Top