तुळजापूर /प्रतिनिधी 

तालुक्यातील मौजे बारुळ येथ  दि.15 जुन रोजी  प्रधानमंत्री योजने अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचा मार्फत ग्रामीण भागातील लाभार्थीना घरकुल देण्यात आले होते.  गरीब व ज्यांना पक्क्या निवाऱ्याची सोय नाही अशा लोकांना प्रधानमंत्री व रमाई आवास योजने मधून पक्के घर बांधून दिले जाते. त्या प्रमाणे मौजे बारुळ येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून 28 व रमाई आवास योजनेतून 7 असे एकूण 35 घरकुलचे काम चालू आहे. त्यामधील दशरथ शामराव टोम्पे यांचा घरकुल प्रवेशाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे , उपसभापती शरद जमदाडे, जिल्हा परिषद सदस्या सर्जेताई  यांचा प्रमुख उपस्थित प्रवेश करण्यात आले, त्याच बरोबर प्रत्येक घरकुला समोर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना अध्यक्षा यांनी दिल्या .

या वेळी गट विकास अधिकारी प्रतापसिंह मरोड,  सरपंच सिंधुताई सुपनार,  विस्तार अधिकारी संजय राऊत,  माजी सरपंच शहाजी सुपनार,  नबीलाल शेख, ग्रामसेवक के. ए. केवळाराम, अनिल यावलकर, सुमन ठोंबरे, दीपाली यावलकर, सुनंदा सुपनार,शिवाजी स्वामी   सुनीता क्षीरसागर, सविता सालपे आदी महिला उपस्थित होते, कार्यक्रमचे सूत्रसंचालन सुधीर सुपनार यांनी केले तर आभार नबीलाल शेख यांनी मानले.

 
Top