तुळजापूर / प्रतिनिधी- 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधुन श्रीतुळजाभवानी सैनिक विधालयात वनविभाग व सामाजिक वनिकरण परिक्षेञ तुळजापूर यांच्या संयुक्त विधमाने शनिवार दि.५रोजी आँक्सीजन देणारे व पर्यावरण पुरक  २५० वृक्षाचे वृक्षरोपन करण्यात आले.

शनिवार दि ५ जून  ते १७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत  प्रतिव्यक्ती तीन वृक्ष लावणे संकल्प शासना मार्फत करण्यात आला असुन त्या अनुषंगाने शनिवारी श्री तुळजाभवानी सैनिक माध्यमिक उच्च माध्यमिक विधालयात सामाजिक वनीकरण विभागाचे   शिंदे नायब, तहसिलदार गाडे मँडम, प्राचार्य चंद्रकांत घोडके आदी मान्यवरांचा उपस्थितीत सोशल डिस्टंसचे पालन करीत वृक्षारोपन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सामाजिक वनीकरण व वनीकरण विभागाचे आधिकारी उपस्थितीत होते.


 
Top