तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील जळकोट येथे आज ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्राधिकरणाच्या आवारात तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत मरोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच पती बसवराज कवठे,मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश कदम, शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख कृष्णात मोरे,ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, अंकुश लोखंडे,कल्यानी साखरे, सोसायटीचे चेअरमन राजु पाटील, बबन मोरे, महादेव सावंत ,विजय यादगौडा, बसवराज भोंगे, विस्तार अधिकारी के.बी.भांगे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण,पारे,जे.के. आदी उपस्थित होते.


 
Top