भूम / प्रतिनिधी-

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य विभगाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. यामुळे पुणे येथील परसिस्ट फाउंडेशनकडून भूम येथील ग्रामीण रुग्णालयांना २ व वाशी येथील रुग्णालयांना १ अद्यावद बायपॅप मशिन देण्यात आली आहेत.

केविडच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. आरोग्य विभागाकडेही रुग्ण वाढत असल्यामुळे यंत्रणासामग्री अपुरी पडत आहे. यामुळे बाहेरूनही सध्या मदतीचा हात देण्यात येत आहे. यातूनच पुणे येथील परसिस्टट फाउंडेशन यांनी भूम ग्रामीण रुग्णालयासाठी दोन अद्यावद बायपॅप मशीन व वाशी येथील रुग्णालयासाठी १ मशीन देण्यात आली आहे. हे बायपॅप मशीन म्हणजे मिनी व्हेंटिलेटर म्हणून ओळखले जाते.

या मशीनमुळे रुग्णांची होणारी गैरसोय काही प्रमाणात दूर होणार आहे. या तीनही मशीन भूम येथील सुदर्शन जगदाळे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या आहेत. या तीनही मशिन सुदर्शन जगदाळे व कोरोना निर्मूलन समितीचे सदस्य संदीप बागडे, अरविंद शिंदे, दिलीप गाढवे, दीपक खराडे, जयेंद्र मैंदर्ग यांच्या उपस्थितीत भूम ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. संदीप जोगदंड, डाॅ. भगवान गोपालगरे यांच्याकडे देण्यात आल्या.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले तसेच नंतर आभाराचा कार्यक्रम झाला.

 
Top