उमरगा /प्रतिनिधी-

 तालुका जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. ३१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रारंभी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोविड सेंटर उभारून रुग्णांची सेवा केल्याबद्दल जय मल्हार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवाई हॉस्पिटल ॲन्ड कोविड सेंटरचे डॉ. विजय बेडदु्र्गे व डॉ. के. डी. शेंडगे हॉस्पिटल कोविड सेंटरचे डॉ. सचिन शेंडगे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

आली. वर्षभरात कोविड रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या डॉ. सचिन शेंडगे व दोन वेळा स्वतः पॉझिटिव्ह होऊन रुग्ण सेवा देणारे डॉ. विजय बेडदुर्गे या दोन्ही डॉक्टरांचा शेंडगे रिसर्च सेंटरचे डॉ. राजाराम शेंडगे, सेवानिवृत्त शिक्षक शिवदास कुलकर्णी, जालिंदर सोनटक्के, कालिंदा घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी गुंडेराव दुधभाते, प्रा. ब्याळे, शिवराज गळाकाटे आदींची उपस्थिती होती. सत्कार व सन्मान सोहळ्यासाठी राघवेंद्र गावडे, सिध्देश्वर काळे, राजेंद्र दुधभाते यांनी पुढाकार घेतला.

कोविड सेंटर उभारून रुग्णांची सेवा केल्याबद्दल जय मल्हार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवाई हॉस्पिटल ॲन्ड कोविड सेंटरचे डॉ. विजय बेडदु्र्गे व डॉ. के. डी. शेंडगे हॉस्पिटल कोविड सेंटरचे डॉ. सचिन शेंडगे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

साधेपणाने मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. वर्षभरात कोविड रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या डॉ. सचिन शेंडगे व दोन वेळा स्वतः पॉझिटिव्ह होऊन रुग्ण सेवा देणारे डॉ. विजय बेडदुर्गे या दोन्ही डॉक्टरांचा शेंडगे रिसर्च सेंटरचे डॉ. राजाराम शेंडगे, सेवानिवृत्त शिक्षक शिवदास कुलकर्णी, जालिंदर सोनटक्के, कालिंदा घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी गुंडेराव दुधभाते, प्रा. ब्याळे, शिवराज गळाकाटे आदींची उपस्थिती होती. सत्कार व सन्मान सोहळ्यासाठी राघवेंद्र गावडे, सिध्देश्वर काळे, राजेंद्र दुधभाते यांनी पुढाकार घेतला.

उमरगा. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कोविड योध्दा म्हणून डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. सचिन शेंडगे यांचा सन्मान करण्यात आला.


 
Top