उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) जून 2021 साठी प्रति लाभार्थी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ असे एकूण दोन किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी  चारुशिला देशमुख यांनी पत्रान्वये कळविले आहे.

 जिल्ह्यात मे 2020 ते ऑगष्ट 2020 या कालावधीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या अन्नधान्यातून वितरीत करुन शिल्लक राहिलेले अन्नधान्य जून 2021 साठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती एक किलो गहु व एक किलो तांदूळ या प्रमाणे दोन किलो अन्नधान्य सवलतीच्या दराने (गहू रुपये 8 प्रतिकिलो व तांदुळ रुपये 12 प्रतिकिलो) देय आहे. जिल्ह्यातील उस्मानाबाद, वाशी, तुळजापूर, भुम व लोहारा या  तालुक्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य प्रथम मागणी करणा-यास (FIRST COME FIRST SERVED) या तत्वानुसार वितरण करण्यात येणार आहे.

  त्याअनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.


 
Top