उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, उस्मानाबाद येथे अशासकीय वसतिगृह अधीक्षक हे निवासी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने रोजंदारी तत्वावर माजी सैनिकातून भरावयाचे आहे. 5 जून 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगाव(नि) यांनी केले आहे.

 माजी सैनिक जेसीओ सुभेदार,सुभेदार मेजर किंवा तत्सम या पदावरून निवृत्त झालेल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडे माजी सैनिक ओळखपत्र, डिस्चार्ज बुक, आधार कार्ड व इतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करावे. निवासी पदासाठी जेसीओ उपलब्ध न झाल्यास हवालदार किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिकांनी कागदपत्रासह अर्ज सादर करावेत,असे आवाहनही श्री. तुंगाव यांनी केले आहे.   


 
Top