उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब येथील दुय्यम निबंधक कनिष्ठ लिपिकाने कार्यालयातील कनिष्ठ प्लॉटची नोंद करण्यासाठी चारशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे रंगेहात पकडले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाआड केले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुधाकर मारुती तेलंग (वय ५० वर्ष) याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने असलेल्या प्लॉटच्या खरेदी खताची नक्कल आणि सूची क्र. २ ची नक्कल घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब येथे गेले असता तेलंग यांनी तक्रारदाराकडे सदर कामासाठी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती ४०० रुपयांची लाचेची रक्कम दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब येथे पंच साक्षिदारा समक्ष स्विकारली. कारवाईलाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद  विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल  खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उस्मानाबादचे पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. यासाठी त्यांना पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, सिद्धेश्वर तावस्कर, विष्णू बेळे, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली. कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन,  अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची  मागणी करत असेल तर लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे  संपर्क करावा असे आवाहन पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते (मो.नं. ९५ २७९४३१००), पोलिस निरीक्षक  गौरीशंकर पाबळे, (मो.नं. ८८८८८१ ३७ २०), पोलिस निरीक्षक अशोक  हुलगे (मो.नं. ८६ ५२ ४३ ३३ ९७) यांनी केले आहे.

 
Top