उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या काव्यसंग्रहाला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडमीच्या वतीने उत्कृष्ठ कवितासंग्रहाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार वितरित केला जाणार असल्याचे अकॅडमीचे सचिव प्रकाश घादगीने यांनी कळविले आहे. पुरस्काराचे हे 13 वे वर्ष आहे.

 उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्राहची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडमीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी लातूरच्या वतीने सन २०१९-२० साठी “उन्हानं बांधलं सावलीचं घर” या कविता संग्रहाची दखल घेऊन राज्यस्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्या वतीने सन 2019-20 करीता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात आले होते. यात कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मकथा या विषयावरील ग्रंथ मागविण्यात आले होते. आलेल्या ग्रंथातून मान्यवर परिक्षकांनी काव्य विभागातुन भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्राहाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीची घोषणा अकॅडमीच्या वतीने करण्यात आली. मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या भाग्यश्री केसकर यांच्या कवितासंग्राहाला महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानेही नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.


 
Top