तेर / प्रतिनिधी-

गुंज या सेवाभावी संस्थेच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 25 गरजूना किराणा कीटचे  वाटप करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाने विनंती केल्यामुळे सामाजिक कार्यात अग्रेसर  असणाऱ्या गुंज या सेवाभावी संस्थेने तेर येथील 25 गरजुना किराणा कीटचे वाटप ग्रामीण रुग्णालयातील डॉ.एस.पी. कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले . 

यावेळी गुंज सेवाभावी संस्थेचे मराठवाडा समन्वयक अजित कांकरिया, तेर ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष अॅड. बालाजी भक्ते, तानाजी पिंपळे, नवनाथ पांचाळ ,नरहरी बडवे ,विलास टेळे, गोपाळ थोडसरे,समिर बनसोडे आदी उपस्थित होते.

 
Top