उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा प्रशासकीय विभागातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी त्वरित करून घेण्याचे आवाहन औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त दिनकर पावरा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित कालमर्यादेत जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणेबाबत आदेशित केले आहे.यामुळे  विहित कालमर्यादेत जात पडताळणीची पुर्तता करण्याचा निर्णय समितीव्दारे घेण्यात आलेला आहे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रस्ताव समिती कार्यालयास सादर केला असल्यास त्यासंदर्भात पुढील पडताळणी कार्यवाही करण्यासाठी आपले नाव,पत्ता व इतर आवश्यक माहितीसह विनंती अर्ज या कार्यालयाच्या इमेल आयडी tcscaur.mah@nic.in वर सादर करावा.

       विद्यार्थ्यांची आणि पालकांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रकरणे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणार असल्याने शैक्षणिक नुकसान होणार नाही,असेही श्री. पावरा यांनी म्हटले आहे.


 
Top