उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दि.18 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे शासकीय विमानाने मुंबईहून सकाळी 7:50 वाजता औरंगाबाद येथे आगमन होणार आहे.औरंगाबाद  येथून मोटारीने बीड येथून 12:45 वाजता गिरोली (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार आहे.12:45 ते 1:45 या कालावधीत माजी आमदार राहूल मोटे यांच्याकडे त्यांचा वेळ राखीव आहे.गिरोली येथून दुपारी  2:45 वाजता त्यांचे उस्मानाबाद येथे आगमन होणार आहे. दुपारी 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्हयातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थीतीचा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत.दुपारी 4:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. सायंकाळी 5:15 वाजता श्री.पवार मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील.


 
Top