उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरात राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.17 जून  रोजी जिजाऊ चौक या ठिकाणी राजमाता    जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त उस्मानाबाद नगरपालिकेतील स्वच्छता विभागाच्या महिलांना दोन ते तीन महिने पुरतील एवढा किराणा  किट 21  वाटप करण्यात आले, त्याचबरोबर शहरातील गरीब व अत्यंत होतकरू महिला यांना देखील किराणा किट चे वाटप करण्यात आले.

 या प्रसंगी जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा  सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.  तसेच समितीचे पदाधिकारी अनुक्रमे अतुल कावरे, राज निकम, मनोज देशमुख, अभय तांबे, स्वप्नील पाटील, धनश्री कोळपे, भारती गुंड , इत्यादी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी किट वाटप केले. 

याप्रसंगी  भालचंद्र जाधव सर डॉ सुभाष वाघ ,प्रदीप कुमार गोरे,रोहित बागल,हनुमंत काकडे,जयराज खोचरए,अमित उंबरे, विजयकुमार बाप्पा पवार,प्रा विवेक कापसे, दिनेश बंडगर, निलेश शिंदे,प्रा.मनोज डोलारे, बालाजी पोद्दार,  शितल देशमुख, चित्रा सोनटक्के, सारिका उमरकर ,शीतल उटगे, तृप्ती त्रिकोणी, उषा मिसाळ, अपर्णा देशमुख, दिपाली राऊत, मनीषा माने यांची उपस्थिती होती


 
Top