परंडा / प्रतिनिधी : - 

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.संभाजी माणिकराव गाते यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने पीएचडी संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. 

 विद्यापीठाच्या झालेल्या आर आर सी मध्ये डॉ. संभाजी गाते यांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून 2020-21या शैक्षणिक वर्षापासून पीएचडी  च्या चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.संभाजी गाते यांना मिळालेल्या या पीएचडी मार्गदर्शकाच्या मान्यतेमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे ,महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे, आयक्यू एसीचे समन्वयक प्रा.डॉ.महेशकुमार माने, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रशांत गायकवाड, ग्रंथपाल प्रा.डॉ. राहुल देशमुख, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.संजीवन गायकवाड तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापक डॉ.संभाजी गाते यांचे अभिनंदन   केले आहे.


 
Top