उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी ६७ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व १०९ लघु पाटबंधारे दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही कामे आवश्यक असून, येणाऱ्या काळात यासाठी १०० ते १२५ कोटी रुपयांची गरज व्यक्त करून एकाचवेळी हा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बाेलत होते.

पालकमंत्री गडाख म्हणाले, जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राथमिक तत्वावर तीन ठिकाणी अर्ध स्वयंचलित यांत्रिकी गेट बसविण्यास मान्यता दिली आहे. आपल्या आकांक्षित जिल्ह्यात येणाऱ्या काळात विकासाची कामे करताना सर्वांची साथ हवी आहे. जिल्ह्यातील सध्याच्या प्राप्त निधीतून ६७ कोल्हापुरी बंधारे आणि १०९ लघु पाटबंधाऱ्यांच्या दुरूस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या काळात या कामांना गती देता आली नाही. परंतु जिल्ह्यातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जुन्या सर्व बंधाऱ्यांची एकाच वेळी जिल्हा नियोजनमधून आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून दुरूस्ती करण्यात येईल.मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षापूर्वीचा अभ्यास केला असता दर वर्षी १०० ते १५० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. जिल्ह्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील जून्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचे काम एकाच वेळी (वन स्ट्रोक) हाती घेण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त देण्यात येईलच, त्याशिवाय राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून हे काम केले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत दे. कुंटला,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम श्री. कुंटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर आदी उपस्थित होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे आदींनी मनोगतातून भूमिका मांडली. कृषी विभागाने काढलेल्या खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीवरील पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक नियेाजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी केले.

...तर इमारतीच्या दुरुस्तीसाठी पैसे देणार नाही

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री गडाख यांनी सोमवारी केले. या वेळी नियोजन भवनच्या इमारतीचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होतोय. मराठवाड्यातील दुर्लक्षित अशा जिल्ह्यात अतिशय देखणी इमारत उभी राहिली आहे. येथून जिल्ह्याच्या विकासाचे चोख नियेाजन व्हावे. लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे या इमारतीची स्वच्छता आणि देखभाल व्हावी. परंतु मी पालकमंत्री असेपर्यंत या इमारतीच्या दुरूस्तीसाठी एक पैसाही देणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे मतही पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षापूर्वीचा अभ्यास केला असता दर वर्षी १०० ते १५० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. जिल्ह्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील जून्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचे काम एकाच वेळी (वन स्ट्रोक) हाती घेण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त देण्यात येईलच, त्याशिवाय राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून हे काम केले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत दे. कुंटला,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम श्री. कुंटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर आदी उपस्थित होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे आदींनी मनोगतातून भूमिका मांडली. कृषी विभागाने काढलेल्या खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीवरील पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक नियेाजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी केले.


 
Top