तुळजापूर / प्रतिनिधी -

येथील श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना प्रवेश  बंद असल्याने  भाविक अभावी  गोरगरीब पुजारी  वृदांची आर्थिक  स्थिती घालावली होती. त्यामुळे श्री तुळजाभवानी  पुजारी मंडळाच्या वतीने गरजू गरजूंना आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके,  युवा नेते विनोद गंगणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत  जीवनाश्यक व शैक्षणिक  साहित्य कीट  वाटप करण्यात आले.

यावेळी संचालक नरेश अमृतरा,  शांताराम पेंदे, अविनाश गंगणे,  शिवाजी बोदले, अजित क्षिरसागर, राहुल खपले ,संभाजी भांजी,  सुधीर रोचकरी, सुजय  हंगरगेकर, सचिन कदम आदी संचालकासह बापुसाहेब कणे उपस्थितीत होते.

 
Top