वाशी/ प्रतिनिधी -

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे शारिरीक शिक्षण विभाग, एन.एस.एस, एन.सी.सी, IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयात आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने योग दिनाचे महत्व सांगून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला योग शिक्षक म्हणून प्रा.शहाजी चेडे हे लाभले. त्यांनी कोरोना माहामारी मध्ये आपण स्वतः ला निरोगी कसे ठेऊ शकतो त्याबद्दल त्यांनी योग प्रत्याक्षीके सादर केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ अरुण गंभीरे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ आनंद करडे तर आभार प्रा.रवी चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन झूमच्या माध्यमातून उपस्थित  होते.


 
Top