उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील रत्नाकर धनके (रा. समर्थनगर) व कृष्णा सोनटक्के (रा. बेंबळी) यांचे स्मार्टफोन हरवल्याने आनंदनगर पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी तक्रार नोंदवण्यात आली होती. आनंदनगर पोलीसांनी तांत्रिक तपास केला.त्यानंतर पोलिसांना हे दोन स्मार्टफोन अन्य व्यक्ती वापरत असल्याचे निदर्शनास आले. एपीआय दिनकर गोरे यांच्या पथकाने संबंधित व्यक्तींकडून स्मार्टफोन जप्त केले. गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड व आनंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश चव्हाण यांच्या हस्ते नमूद स्मार्टफोन मूळ मालकांना परत करण्यात आले.


 
Top