तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील  शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती शुक्रवार दि.१४ रोजी साजरी करण्यात  आली  शुक्रवार सकाळी महंत मावजीनाथ महाराज यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धभिषेक घालून पूजा केली व नंतर फटक्यांची आतिषबाजी करून जयंती उत्सव साजरा करण्यात आली.

यावेळी सुदर्शन वाघमारे, परीक्षित साळुंके,प्रतीक परमेश्वर,योगी खुंटाफळे, राजू भोरे,शंतनू नरवडे, गणेश धनके, शिवराज जाधव, अभिषेक पवार,राहुल शिंदे,ओंकार पवार ,दादा बचाटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच भष्ट्राचार समिती जिल्हाध्यक्ष अँड धीरज जाधव यांनी छञपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आपसिंगा येथे ग्रामपंचायत मध्ये छञपती संभाजी महाराज व बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. 


 
Top