तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील कमान वेस भागातील  अनम जमीर शेख ह्या 10 वर्षाच्या चिमुरडीने रमजान महिन्यातील 30 पवित्र रोजे अर्थात उपवास यशस्वीपणे पुर्ण केले व पुर्ण महिना कुरानचे वाचन करून, अनमने कोरोना संसर्गपासून माझा भारत देश लवकरात लवकर मुक्त कर अशी अल्लाहकडे प्रार्थना केली.

 अनम शेख ही लिटल फ्लॉवर मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे इयत्ता 5 वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या कडक उन्हाळा आहे, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच अनम हिने पुर्ण महिन्याचे रोजे धरून ते यशस्वीपणे पुर्ण केल्याने तिचे वडील जमीर शेख, आई नसरीन शेख, आजोबा इब्राहीम, आजी बिबीजान, खुर्शीद, फेरोजा, काका अमानुल्ला, आत्या साहेरा मौजन, जाकेरा, शाकेरा, ताहेरा शेख, चुलती रब्बाना, शबाना, भाऊ नजीब, सैफ, कैफ, रिहान, ओमान, मामा इस्माईल, हाजी, फयाज, आयाज, इलियास मौजन आदींनी तिला शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले.


 
Top