तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरात शुक्रवार दि. १४ रोजी अक्षयतृतीया, रमझान ईद, छञपती संभाजी महाराज जयंती कोरोनाच्या सावटा खाली साधेपणाने साजरी करण्यात आली.अक्षयतृतीय पार्श्वभूमीवर आज श्रीतुळजाभवानी मातेस शिवकालीन एक नंबर अलंकार डब्यातील सोन्याचे संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले आहे. 

तुळजापूर तालुक्यात मोठ्या संख्येने हिंदू  -मुस्लीम बांधवांच्या घरात अक्षयतृतीया व ईद सण अतिशय साधेपणाने पार पडला . मुस्लीम बांधवांनी ईदचा नमाज सकाळी सात ते नऊ वाजे पर्यत घरीच अदा करुन कोरोना संकट दूर कर अशी अल्लाचरणी प्रार्थना केली कोरोना पार्श्वभूमीवर आज शिरकुर्माचा आस्वाद घेण्यापासुन हिंदू बांधव वंचित राहिले हिंदू मुस्लीमांना ऐकमेकांना शुभेछा देत सण साजरे केले.

अक्षयतृतीय व रमझान ईद पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लीम धर्मियांनी देशावरील कोरोनाचे संकट दुर कर अशी हिंदूनी श्रीतुळजाभवानी चरणी तर मुस्लीम बांधवांनर रमझान ईदची नमाज अदा करताना अल्ला चरणी प्रार्थना केली.

 
Top