उस्मानाबाद /प्रतिनिधी -
जिल्ह्यात शुकवारी (दि.२८) ४५ वर्षांवरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ४६ निवडक आरोग्य उपकेंद्रांमधून कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असून, २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि पोलीस रुग्णालयात (उस्मानाबाद) कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे, तसेच ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रथम येणाऱ्यांसाठी लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. जिल्ह्यात २८ मे रोजी ६१ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत. लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंगची गरज नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्यांना क्रमाने लस दिली जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत. ज्या केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिला जाणार आहे, अशा ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी आणि रांगा ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत आणि नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी आणि लाभार्थ्यांनी कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
या उपकेंद्रांमध्ये होणार लसीकरण (तालुकानिहाय)
उस्मानाबाद : उपळा मा, रुईभर, कसबे तडवळा, वडगाव सि, येवती, अंबेजवळगा, चिखली, भंडारी, पळसप, सांजा.
तुळजापूर: अपसिंगा, होर्टी, नंदगाव, काक्रंबा, तामलवाडी, पिंपळा खुर्द, ईटकळ
उमरगा : गुंजोटी, बलसुर, माडज, तुरोरी, कदेर
लोहारा: मार्डी, होळी, वडगाव गांजा, अचलेर
कळंब: खामसवाडी, पानगाव, पाथर्डी, गौर, भाटशिरपुरा, देवळाली, पाडोळी, रांजणी
वाशी: सरमकुंडी, पिंपळगाव लिंगी, बावी
भूम: अंतरवली, सुक्टा, देवळाली, वरुड, चिंचपूर
परंडा: सिरसाव, लोणी, डोंजा, वाटेफळ
नागरी भागातील लसीकरण
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद, कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस (पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थींनाच दुसरा डोस) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राम नगर, उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ फ्रन्टलाइन वर्करसाठी), ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम,उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परांडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद.
