वाशी /प्रतिनिधी - 

महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघ केंद्रीय कार्यकारिणी     आॅनलाईन बैठक २०मे २०२१ संस्थापक अध्यक्षा पद्मा  तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.  

या आॅनलाईन बैठकीमध्ये संघटनेचे मार्गदर्शक संजय देशमुख व दिनेश कुटे  यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र खाजगी ( कर्मचारी सेवेच्या शर्ती १९८१) नुसार शालेय   प्रशासन चालत असून  गेल्या ४० वर्षापासून  डी. एड. पदवीधर   माध्यमिक  शिक्षकांना  मिळत असलेल्या दुय्यम  वागणुकीचा  निषेध करून अधिसूचना ८जून  २०२० प्रमाणे  अंमलबजावणी तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय  महासंघाच्या  केंद्रीय अध्यक्षा पद्मा तायडे जाहीर केला.  महासचिव बाळा  आगलावे व लातूर विभागाचे  सचिव लक्ष्मण राठोड  यांनी डी. एड.  पदवीधर  शिक्षकांवर  होत  असलेल्या  अन्यायाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तर  कार्याध्यक्ष  नंदकिशोर गायकवाड यांनी  शासनाने ८ जून २०२० रोजी  अधिसूचना प्रसारित करुन शिक्षकांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु अजून ही या अधिसूचनेची  अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला आंदोलना शिवाय  पर्याय नसल्याचे म्हणाले. उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, बंडुभाऊ धोटे, राजेंद्र मसराम यांनी या मताला दुजोरा देऊन  हा मार्ग आपल्यासाठी  अंतिम असून ती अवलंबिण्याची वेळ  आल्याचे बोलून दाखविले  कोषाध्यक्ष  शहरात हुसेन  विभागीय सचिव  काळूराम  धनगर , जांभुळे, बापूसाहेब सावंत, बी. डी. कांबळे  आदी सदस्यांनी  आंदोलनाला  सहमती दर्शवली. कोरोना  नियम  पाळत ८जून  २०२१ रोजी तीव्र आंदोलन करण्याचा  निर्णय कार्यकारिणी ने घेतला असल्याचे लातूर विभागाचे सचिव लक्ष्मण राठोड यांनी सांगितले.

 
Top