उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. उस्मानाबादच्या वतीने शासकिय जिल्हा रुग्णालय उस्मानाबादला तातडीने कोविडसाठी लागणारी  यंत्र उपकरणे खरेदीसाठी दिड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. इ. सी. जी.मशिन 2 नग,आॅक्सिजन सिलेंडरसाठी लागणारे फ्लो मिटरचे 20 नग,जम्बो आॅक्सिजन सिलेंडरसाठी लागणारे कनव्हर्जन किट 6 नग, आदी उपकरणे खरेदीसाठी मदत करण्यात आली.

 भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजयदादा देशमुख,सचिव अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष भारत गरड,संचालक बालाजी तांबे,प्रा.अमोल दिक्षीत,बालाजी कोळी यांनी दिड लाख रुपयांचा धनादेश शासकिय जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकीत्सक डाॅ. धनंजय पाटील,आर.एम. ओ. डाॅ. सचिन देशमुख,डाॅ. महेश कानडे,डाॅ.सतीश आदटराव,डाॅ. बलवंडे यांच्याकडे देण्यात आला. तसेच एप्रिल2021 मध्ये जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पतसंस्थेने 50000(पन्नास हजार)रुपयांचा धनादेश दिला.

 
Top