मुरुम  / प्रतिनिधी- 

  येणेगूर, ता. उमरगा येथील ग्रामपंचायच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन कक्षास उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड, स्पर्श रुग्णालय, सास्तूरचे नामवंत डॉ.रमाकांत जोशी यांनी मंगळवारी (ता.११) रोजी भेट दिली.

 येणेगूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोना महामारी रोखण्यासाठी गावात कोरोना महामारीचा प्रसार होऊ नये, म्हणून आयसोलेशन कक्षाची सुरुवात कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात करण्यात आली. या उपक्रमासाठी युवानेते किरण गायकवाड यांच्या माध्यमातून २० बेडसह साहित्य देण्यात आले. या भेटीदरम्यान आयसोलेशन कक्षामध्ये येणाऱ्या रुग्णास रोटरी क्लब, मुंबई यांच्या वतीने तसेच स्पर्श रुग्णालय, सास्तुर यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिसिन किट विविध तज्ञ डॉक्टरांनी तयार केलेले कीट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकरिता सिम्टम्स, असिमथोमॅटीक अशा सर्व रुग्णांसाठी २५ मेडीसीन किट ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आले. कोरोना योद्ध्यांनी स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान आमदार यांनी केले. किरण गायकवाड यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीला दिले. 

यावेळी उमरगा तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शाहपूरे, उमरगा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीरभाऊ पवार, नगरसेवक कोणे, उमरगा लोहारा विधानसभा युवासेना संपर्कप्रमुख शरद पवार, येणेगूर महोत्सवाचे संयोजक प्रदीप मदने, शिवसेना शाखाप्रमुख अशोक माळी, जेष्ठ शिवसेनानेते श्रीकांतकाका मंगरुळे, दिलीप संगशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य दिलीपभाऊ येडगे, युवासेना उपतालुका प्रमुख संदीप जगताप, येणेगूर उपसरपंच वैभव बिराजदार, प्रा.शरद गायकवाड, येणेगूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सावळकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य येणेगूर महादेव बिराजदार, ग्रामविकास अधिकारी पी.टी.डावरे, बालाजी दूधभाते साहेब, योगेश पांचाळ, रुग्णालयातील कर्मचारी विशाल, युवा सैनिक लखन भोरे, ग्रामपंचायत कर्मचारी राजू कलशेट्टी, सचिन दूधभाते, कुमार येडगे, विजयकुमार घंटे आदींची उपस्थिती होती.

 
Top