मुरुम  / प्रतिनिधी- 

विठ्ठलसाई कारखाना जवळील शासकीय वस्तीगृह व निवासी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर येथे बसव प्रतिष्ठाणच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आले. बसव प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील जयंती साधेपणाने साजरी केली. 

प्रारंभी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.वसंत बाबरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण शुक्रवारी (ता.१४) रोजी करुन अभिवादन करण्यात आले. यांच्या हस्ते या सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचारी, होमगार्ड यांचा  सत्कार करून कृतज्ञता सन्मान पत्र देऊन कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. संघटनेच्या वतीने सकाळी रुग्णांना नाष्टा व जेवण देण्यात आले. सद्या येथील सेंटरमध्ये ९० रुग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे या अन्नदानासाठी मुरूम येथील इयत्ता पाचवीत शिकणारा विरेण मनीष मुदकण्णा या विद्यार्थ्यांने त्याला गणपती डेकोरेशन व शालेय संस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या बक्षीसाची रोख रक्कम १५०१ रुपयाची मदत केली. बसव प्रतिष्ठाण या अखिल भारतीय सामाजिक संघटना केवळ जयंती नव्हे तर कायम सामाजिक उपक्रम घेत गतवर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटना बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरे करुन त्यातील खर्च वाचवून कोरोना रुग्णांना मदत करीत आहे.

 यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, संतोष येवले, गुंडू पुराणे आदींच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

 
Top