मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी केला चेअरमनचा गौरव 


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

देश कोरोनाच्या अडचणीचा सामना करत असताना, पुढची लाट देशाच्या उंभरट्यावर आली असताना केवळ ऑक्सिजन हेच कोरोना वरील औषध आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याने “मिशन ऑक्सिजन” चालू केले आहे.त्यात चेअरमन श्री.अभिजीत पाटील या तरुणाने मैलाचा दगड ठेवला आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे. आपल्या धाराशिव साखर कारखान्याचे नुकसान करून ऑक्सिजन निर्मिती केली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारखान्याच्या सर्व सहकारी टीमचं मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच श्री.अभिजीत पाटील यांनी येणाऱ्या काळात सर्व कारखानदाराना मार्गदर्शन करावे; आपण सर्व मिळून या परिस्थितीचा सामना नक्की करू असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंानी व्यक्त केला आहे. 


धाराशिव साखर कारखान्याचा देशातील पहिल्या साखर कारखान्याचा ❝ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन❞ व्हर्चुअलव्दारे करण्यात आले.याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे  , केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार  , जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील , आरोग्यमंत्री  राजेशजी टोपे  , उस्मानाबाद पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख  , खासदास  ओमराजे निंबाळकर  , आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार   कैलास पाटील  ,  शिखर बॅकेचे चेअरमन श्री. विद्याधर आनासकर  , सदस्य श्री.अविनाशजी महागांवकर,  जिल्हाधिकरी श्री.कौस्तुभ दिवेगावकर साहेब,VSI चे एस.व्ही.पाटील , मौज इंजिनिअरिंगचे ओक , कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित व्हर्चुअल पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला. 

 ■केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी म्हणाले की, चेअरमन  भिजीत पाटील यांनी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला यासाठी लागणारे सर्व सामग्री त्यांनी १८दिवसा त पूर्ण करून दाखवली त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. साखर कारखानदारी अडचणीत आली असताना देखील श्री. अभिजीत पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हेतर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल. सर्व देशवासियांच्या वतीने खुप खुप त्याचं आभार मानतो. 

■ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला धाराशिव साखर कारखाने पहिली बाजी मारली यासाठी ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहेत ३हजार मेट्रिक टन महाराष्ट्राचे उद्दिष्ट असून अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन करावं व इतर कारखान्याने त्यांची प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्यात हा महत्व महत्वकांक्षी यशस्वी प्रयोग प्रयोग श्री.अभिजीत पाटील यांचा झालेला आहे.ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या त्या वेळी शेतकरी व शेतकऱ्यांचा कारखाना व शेतकऱ्यांची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात. हे आज श्री.अभिजीत पाटील यांच्या रूपात ना आज आपल्याला सर्वांसमोर दिसून आलेला आहे. श्री.अभिजीत पाटील यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. 

■ जलसंपदामंत्री  जयंतजी पाटील म्हणाले की, देशाला दिशादर्शक पाऊल माझे मित्र श्री.अभिजीत पाटील यांनी टाकले असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर्व कारखान्यांसाठी हे अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यांना लागणा-या सर्वच परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. तरी आपण ऑक्सिजनचा पुरवठा करावा. 

 ■आरोग्यमंत्री  राजेश  टोपे म्हणाले की, आज इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. देश महाभयंकर संकटाचा मुकाबला करत असताना धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.ते महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे या प्रयोगाचे सर्व कारखानदारांनी अनुकरण करावे मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो.

■पालकमंत्री  शंकरराव गडाख म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या ह्या देशातील पहिल्या इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने  माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व सहका-याने दिवसरात्र मेहनत करून केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला त्याचं मनापासून अभिनंदन. 

 ■खासदार   ओमराजे निंबाळकर म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हाचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान आज ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं उदघाटन करताना वाटलं.

 ■चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की,  ज्यावेळी सर्व कारखानदारांची VSI मध्ये बैठक झाली त्यावेळी देशाचे नेते आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांनी केलेल्या अवाहनानुसार पवारसाहेब त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हा प्रकल्प उभा करण्याचं धाडस दाखवलं. मी माझ्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून मौज इंजिनिअरिंग तसेच VSI च्या टेक्निकल सपोर्टमुळे व माझ्या संचालक मंडळ व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहका-यांने केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला. ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळी पालकमंत्री गडाख साहेब तसेच खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांनी सहकार्य केले आज हा प्रकल्प उभा करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेतून मी समाजाची सेवा करत राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला.

 
Top