नगर परिषदेच्या वतीने कोरोना निर्मुलनासाठी विविध योजना राबविण्यात येत असून संचारबंदी असताना सुद्धा गुरुवार दिनांक 20 मे 2021 रोजी नगर परिषद हद्दी मधील दुकान उघडे ठेवून व्यवसाय करताना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खालील तीन दुकाने सील करण्यात आली.
उस्मानाबाद राज्य रस्ता येथील सन सिरामिक, जिजाऊ ग्लास आणि भवानी रोड तुळजापूर येथील आष्टगे क्लाथ सेंटर तसेच कोरोना निर्मुलनासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सुचनांची नगरपरिषद तंतोतंत अंमलबजावणी करीत असुन शहरवासीयांनी नियमांचे पालन करून कोरोना निर्मूलनासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी श्री.आशिष लोकरे यांनी केले आहे.
ही कार्यवाही कार्यालय अधीक्षक श्री.व्ही.व्ही.पाठक यांचे नेतृत्त्वाखाली पथक प्रमुख श्री सज्जन गायकवाड,श्री ज्ञानेश्वर टिंगरे, श्री. संतोष इंगळे, श्री खालीद सिद्दिकी, विश्वास मोटे, श्री राजू सातपुते, श्री बापू रोचकरी, श्री नागेश काळे, श्री अण्णा पारधे या कर्मचाऱ्यांनी केली.