उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

लोकसभा मतदार संघातील तेर, डकवाडी, काजळा, सारोळा रोडवरील पुलांच्या बांधकाम व सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गापासून उपळा, तेर, जागजी, कोंड, भेटा हा रस्ता वाहतुकीयोग्य न राहिल्याने वाहतुक करण्यात अडचणी येत होत्या. तसेच सदर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय परिवहन तथा राजमार्ग मंत्री नितीनजी गडकरी  यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी निधी मागणी करून पाठपुरावा केला होता.त्यामुळेच राष्ट्रीय महामार्गापासून उपळा, तेर, जागजी, कोंड राज्यरस्ता एकूण 16 किमी व सारोळा-मेडसिंगा रस्त्यावरील पुल कामासाठी 6 कोटी निधी मंजुर झाला आहे, अशी माहिती सासंद ओमराजे निंबाळकर यांनी दिली. 

 यानुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 ते उपळा, तेर, जागजी, कोंड, भेटा राज्यरस्ता एकूण 16 किमी रस्त्याच्या सुधारणेकरीता 4 कोटी 95 लाख रु. इतका निधी व सारोळा- मेडसिंगा येथील पूलाच्या कामाकरीता रु 97.97 लक्ष इतका निधी मंजूर केला असल्याचे केंद्रीय परिवहन तथा राजमार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांनी दि. 09 मे 2021 रोजी पत्राद्वारे कळविले आहे. एकूण  5 कोटी 93 लाख इतका निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे मतदार संघातील दळणवळण व वाहतुकीच्या समस्येतुन जनतेची सुटका झाली आहे.

 
Top