उस्मानाबाद / प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जेष्ट नेते श्री त्रिंबक मोहन शेळके यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी आज २० मे रोजी सकाळी सोलापूर येथे खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी मराठवाड्यातील सहकारी तत्वावरील पहिल्या तेरणा कारखान्याचे  व्हाइस चेअरमन म्हणूनही काम केलेले होते. 

त्यांच्या कालावधीत तेरणा कारखान्याला अनेक पारितोषिकही मिळाले. डॉ.पदमसिंह पाटील यांचे विश्वासु सहकारी म्हणून त्यांची ख्याती होती. खामसवाडी येथील जगदंबा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ,उस्मानाबाद जिल्हा खरेदीविक्री संघ,कळंब तालुका खरेदीविक्री संघ या ठिकाणीही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.तब्बल 40 वर्ष एकहाती खामसवाडी ग्रामपंचायतवर  त्यांचे वर्चस्व होते . गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

कांही दिवसापूर्वी कोरोनातून निट झाले होते,परंतु शरीरातील रक्तात गाठी निर्माण झाल्याने पृकृती बिघडली.सोलापूर येथे उपचारा दरम्यान त्यांचे  आज गुरुवारी सकाळी दहा वाजता निधन झाले.

 
Top