उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटात आरोग्य विभागाने उत्तम कामगिरी बजावली आहे.उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय येथे कोविड रुग्णांचा चांगला उपचार केल्याबद्दल येथील डाॅक्टर,नर्स यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस संघटनेचे अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या मार्फत करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील,डॉ. सिमरन चव्हाण,इन्चार्ज वाहिदा शेख,स्टाफ मनीषा जगदाळे,स्नेहल वाघमारे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती आर एम ओ डॉ.सचिन देशमुख, वैद्यकीय अधिकारी गणेश पाटील,वैद्यकीय अधिकारी गोसावी,डॉ.महेश पाटील,अखिल भारतीय समता परिषद चे जिल्हाध्यक्ष महादेव माळी,रॉबिन बगाडे रुग्ण कल्याण समिती सदस्य अ.लतीफ अ मजीद,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,इन्चार्ज नलीनी दल मंजन,रौफ शेख ब्रदर, जितेश होळकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.