उस्मानाबाद / प्रतिनिधी -
वाढत्या कोरोना रुग्णामुळे उस्मानाबाद शहरासह जिल्हयात प्रशासना ने लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात ही कांही लोक विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न वापरणे अशा प्रकारचे गैरवर्तन करत होते. जिल्हयातील व शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांनी कडक धोरण अवलंबल्याचे सोमवार दि. २४ मे रोजी पहायला मिळाले विनामास्क विनाकारण फिरणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणेअशा विविध कलमावरुन सोमवारी दि.24मेरोजी 72 हाजार 100रुपये दंड वसुल करुन 300च्यावर केसेस केल्या अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली
उस्मानाबादसह जिल्हयात कोराणाग्रस्त रूग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सुध्दा रूग्ण संख्या वाढतच होती. सोमवार दि. २४ मे रोजी पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यामुळे रस्त्यावरील वाहतुक मंदावली होती. उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज, चौक सांजा रोड वरील उड्डाण पुल, मार्केंट कमिटी, एमआयडीसी रोड, बार्शी नाका आदी भागात सोमवारी दुपारी १२ पासून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपण कशामुळे बाहेर फिरत आहात आदी संदर्भात कारणे विचारली जात होती. योग्य कारण असल्यास सोडून दिले जात होते. तर अयोग्य कारणास्तव फिरणाऱ्या लोकांवर केसेस करण्यात आल्या. या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दै.लोकराज्यशी बोलताना सांगितले की, सोमवारी राञी 8पर्यंत 72 हाजार 100 रुपये दंड वसुल केला यात सोशल डिस्टंन्स नपाळणे157केसेस, विना मास्क फिरणे-9केस , सार्वजनिक ठिकाणी थुंकणे11केस ,आस्थापना उघडे ठेवणे 4 केस, विनाकारण भटकणे151केसेस, अशी कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे ट्राफिक पोलिसांनी पण वेगळी कारवाई केली त्या मुळे विनाकारण फिरणार्याना जरब बसणार आहे