उमरगा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील मुरूम येथील पसायदान फाऊंडेशनच्या वतीने २५ ऑक्सिजनसेट, स्टरईल वॉटर, बेटाडाईन गार्गल आदी कोरोना बाधित रुग्णासाठी अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्य ग्रामीण रुग्णालय मुरूम यांना देण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूम ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फंगल इन्फेक्शन होऊ नये, म्हणून सदस्य रमेश लोहिया यांच्या वतीने २५ ऑक्सिजन सेट तसेच फाउंडेशनच्या वतीने स्टरईल वॉटर, बेटाडाईन गार्गल आदी वैद्यकीय साहित्य डॉ सत्यजित डुकरे, डॉ विनोद सरवदे, आकाश चव्हाण, बडेसाब शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, पसायदान फाऊंडेशनचे सदस्य डॉ. संतोष शेळके, डॉ सागर काबरा, कुलकर्णी आदी उपस्थित होते. पसायदान फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाबाधित गरीब गरजू रुग्णांना एचआरसीटीची तपासणी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते.

 
Top