उमरगा / प्रतिनिधी - 

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात माऊली प्रतिष्ठान उमरगा यांच्या वतीने लसीकरणाठी येणाऱ्या नागरिकांची निवा-याची व आसनाची व्यवस्था करण्यात आली. 

उमरगा तालुका आणि शहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या आणि याबरोबरच लसीकरणासाठी लोकांचा रुग्णालयात ओघ वाढला आहेे. याठिकाणी उन्हात बसावे लागत होते. याबरोबरच बसायची पण व्यवस्था नव्हती.  नागरिकांना आसनाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणीच वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक बडे आणि डॉ विक्रम आळगेकर यांनी केल्यानंतर लागलीच ४० बाय ५० आणि १० बाय ५० असे दोन ग्रीन शेड उभा करण्यात आले. यासोबतच ६० खुर्च्यांची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने, डॉ विक्रम आळगेकर, डॉ. प्रवीण जगताप, डॉ संदीप पोफळे, डॉ  सोमनाथ कवठे, डॉ पद्माकर घोगे, सिद्धेश्वर माने, अमोल पवार, संतोष कांबळे, संदीप वाघमारे, सौ. शोभा तुरोरे, सौ.अफसर तांबोळी, सौ. मंगल भालेराव, सुभद्रा गाढवे आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, भानुदास बोरूले, शैलेश नागणे, सिद्धू दुधभाते, सुमित घोटाळे, आदी सह स्वंयसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.

 
Top